⚡टाटा कंपनी टेस्लासाठी बनवणार सेमीकंडक्टर चिप्स; Elon Musk यांच्या भारतभेटीआधी दोन्ही कंपन्यांमध्ये मोठा करार
By टीम लेटेस्टली
अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनीने टाटा समूहाच्या टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत सेमीकंडक्टरसाठी करार केला आहे. या धोरणात्मक करारांतर्गत, टेस्ला जगभरातील कामकाजासाठी टाटा कंपनीकडून सेमीकंडक्टर चिप्स खरेदी करणार आहे.