Shivaji Nagar Rape Case: शिवाजी नगरमध्ये 19 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार, 4 जण अटकेत
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबईत पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची (Gangrape) हृदयद्रावक घटना समोर आली आहेही घटना मुंबईतील शिवाजी नगर (Shivaji Nagar) येथील आहे. येथे एका 19 वर्षीय महिलेवर चौघांनी बलात्कार (Rape) केला आहे. ही घटना शनिवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली आहे. चारपैकी तीन आरोपींना शनिवारीच अटक (Arrested) करण्यात आली. चौथ्या आरोपीला आज अटक करण्यात आली. शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजणे यांनी ही माहिती दिली आहे.  महिला केटरिंगचे काम करते. ती शनिवारी सकाळी शिवाजी नगर येथील बैगनवाडी जुना बस डेपो येथून आपल्या घरी जात होती. चार आरोपींपैकी एक आरोपी महिलेला ओळखत होता. जुन्या बस डेपोजवळ आधीच उभ्या असलेल्या आरोपीने संबंधित महिलेला थांबवून विचारले की, यावेळी कोठून येत आहे?

ती कामावरून घरी जात असल्याचे महिलेने सांगितल्यावर त्याने काही कामाबद्दल तिच्याशी बोलायचे असल्याचे सांगितले. असे म्हणत तो महिलेला जवळच असलेल्या रिकाम्या झोपडीत घेऊन गेला. तेथे आणखी तीन जण आले. या चौघांनी मिळून या महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर चारही आरोपी तेथून पळून गेले. पीडितेने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोनवरून ही माहिती दिली. हेही वाचा Dapoli Shocker: दापोली मधील तीन महिलांच्या हत्याकांडाचा पोलिसांकडून 10 दिवसात छडा; आरोपी अटकेत

पीडितेच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 376, 376-डी लावून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी घडलेल्या चारपैकी तीन आरोपींना 24 तासांत अटक करण्यात आली. चार आरोपींपैकी दोन अल्पवयीन आहेत.

पीडितेने पोलिसांना आपला त्रास कथन केला. पीडितेने सांगितले की, बलात्काराच्या वेळी तिने स्वत:ची सुटका करण्यासाठी हात-पाय मारले. मात्र एका आरोपीने त्याचे तोंड हाताने दाबले होते. यातील दोन आरोपी उत्तर प्रदेशला जाणारी ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले.