पिंपरी: लाच घेताना कॅमे-यात कैद झालेल्या त्या महिला वाहतूक पोलिसाने केला अजब खुलासा, म्हणाली
वाहतूक महिला पोलिस लाच घेताना कॅमेऱ्यात कैद (Phoro Credits: Twitter)

आतापर्यंत आपण अनेकदा वाहतूक पोलिसांना लाच घेतानाच्या बातम्या पाहिल्या असतील, ऐकल्या असतील वा वाचल्या असतील. मात्र कधी महिला वाहतूक पोलिसांना लाच घेताना पाहिले आहे का? कालच सोशल मिडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आणि ही बातमी वा-यासारखी पसरली. पिंपरीत (Pimpri) दोन दिवसांपूर्वी भर रस्त्यात एक महिला वाहतूक पोलिस प्रवासी मुलीकडून लाच घेतानाचा (Woman Traffic Police Taking Bribe) व्हिडिओ समोर आला. सीसीटीव्ही कॅमे-यात हा प्रकार कैद झाल्यानंतर त्या महिला वाहतूक पोलिसाला निलंबित करण्यात आले. मात्र याबाबत आता त्या महिला वाहतूक पोलिसाने अजब खुलासा केला आहे. आपल्याला त्या वाहनचालकाने लाच नाही तर खरेदीसाठी पैसे दिले असे स्पष्टीकरण तिने दिले आहे.

या महिला पोलिसाने स्वत:च्या गुन्ह्याची कबूली दिले भलतेच स्पष्टीकरण दिले आहे. ती महिला चालक आपल्या ओळखीची होती. त्यामुळे त्या महिला चालकाने वस्तू खरेदी केली होती ज्याचे पैसे या महिला पोलिसाने दिले होते. त्यामुळे त्या दिवशी ती मुलगी मला ते पैसे परत करत होती असा अजब दावा या महिला पोलिसाने केला आहे. तिचा लाच घेतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर यावर सडकून टिका केली जात होती.हेदेखील वाचा- लाच घेताना महिला वाहतूक पोलिस कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)

काय होत नेमकं प्रकरण?

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, एका दुचाकीवरील दोन महिलांना पोलिसांनी अडविले, त्यापैकी एका महिलेने तेथील महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या जवळ जाते. त्यानंतर पोलिस महिला त्या तरुणीला काहीतरी सांगते आणि त्यानंतर तरुणी पोलिस महिलेच्या मागच्या खिशात पैसे ठेवते. हा व्हिडिओ पिंपरी येथील साई चौक येथील असल्याचे म्हटले जात आहे.