Woman Gives Birth On Road: जळगावमध्ये आदिवासी महिलेने रस्त्यावरच दिला बाळाला जन्म; Rohini Khadse यांची सरकार आणि आरोग्य विभागावर टीका (Watch)

बराच काळ या महिलेला वैद्यकीय मदत मिळाली नाही व त्याच अवस्थेत ती रस्त्यावर पडून होती. खडसे म्हणतात, 'एकीकडे, आपण म्हणतो की भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, आणि दुसरीकडे, आपली एक लाडकी बहिण रस्त्यावर बाळाला जन्म देत आहे. प्रगतीशील भारताच्या खोट्या जाहिरातीमागे माझी लाडकी बहीण किती काळ अपमानित होत राहणार?’

Woman Gives Birth On Road: जळगावमध्ये आदिवासी महिलेने रस्त्यावरच दिला बाळाला जन्म; Rohini Khadse यांची सरकार आणि आरोग्य विभागावर टीका (Watch)
Woman Gives Birth On Road

सामान्य माणसाला आरोग्य सेवा देण्यात प्रशासन कसे अपयशी ठरत आहे याची एक संतापजनक घटना, सोमवारी जळगावमधील (Jalgaon) चोपडा तालुक्यात घडली. वारंवार विनंती करूनही आरोग्य सेवा मदतीला न आल्याने एका आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. बोरमळी हे चोपडा तालुक्यातील एक आदिवासी गाव आहे. 26 मे रोजी रात्री या गावातील एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी आशा वर्करशी संपर्क साधला आणि मदत मागितली, परंतु त्यांनी मदत केली नाही. या दरम्यान महिलेच्या प्रसूती वेदना वाढल्याने, महिलेच्या पतीने तिला दुचाकीवरून जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.

मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, रुग्णालयाकडे जात असतात वाटेतच महिलेची प्रसूती झाली. यावेळी, जवळच असलेल्या एका वृद्ध महिलेने आपल्या ज्ञानाचा वापर करून महिलेची प्रसूती करून तिला वाचवले. अहवालानुसार, रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती, मात्र तासभर वाट पाहिल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही किंवा कोणीही आले नाही. बराच काळ या महिलेला वैद्यकीय मदत मिळाली नाही व त्याच अवस्थेत ती रस्त्यावर पडून होती.

ही घटना समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सपा) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी एफपीजेशी बोलताना संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, राज्यात लाडक्या बहिणींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खडसे म्हणतात, 'एकीकडे, आपण म्हणतो की भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, आणि दुसरीकडे, आपली एक लाडकी बहिण रस्त्यावर बाळाला जन्म देत आहे. प्रगतीशील भारताच्या खोट्या जाहिरातीमागे माझी लाडकी बहीण किती काळ अपमानित होत राहणार?’ (हेही वाचा; Pune Suicide Cases: पुण्यात गेल्या 4 वर्षांत 4,000 हून अधिक आत्महत्यांची नोंद; पहा आकडेवारी)

Woman Gives Birth On Road:

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी चोपडा येथे भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली. फ्री प्रेस जर्नलशी बोलताना त्या म्हणाल्या की, या संदर्भात चार सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. नजीकच्या भविष्यात एक उच्चस्तरीय बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2025 12:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).