WhatsApp Porn Group 'Triple XXX' वर महिलांना Porn Video पाठवणारा ग्रुप अॅडमिन अटकेत
प्रतिकात्मक फोटो (Photo: Getty Images)

लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp वर महिलेला अश्लील व्हिडिओ (PORN Video) पाठवणाऱ्या एका 24 वर्षीय मुलाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या मुलाने Triple XXX नावाने WhatsApp वर एक ग्रुप बनवला होता. त्यातून तो पॉर्न व्हिडिओ पाठवत असे. या ग्रुपमध्ये त्याने एका 44 वर्षांच्या महिलेला तिच्या परवानगीशिवाय अॅड केले होते. या आरोपीचे नाव मुश्ताक अली शेख असून तो पश्चिम बंगालचा रहिवाशी आहे.

अटक केल्यानंतर आरोपीने सांगितले की, "तो संबंधित महिलेला ओळखत नसून तिला WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करण्याचा त्याचा काही मानस नव्हता. चुकीचा मोबाईल नंबर सेव्ह केल्याने संबंधित महिला अनावधानाने ग्रुपमध्ये अॅड झाली. या महिलेऐवजी एका पुरुष मित्राला त्याला ग्रुपमध्ये अॅड करायचे होते."

मात्र WhatsApp वर XXX नावाने ग्रुप बनवल्याची कबुली आरोपीने दिली आहे. पोलिसांनी IPC सेक्शन 354 आणि IT Act 2000 च्या सेक्शन 67 आणि 67 (A) त्याच्यावर खटला दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.