पालघर येथील समुद्र किनाऱ्यावर मृत अवस्थेत आढळला 7.3 मीटर लांबीचा व्हेल शार्क
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

पालघर (Palghar) येथील समुद्र किनाऱ्यावर 7.3 मीटर लांबीचा व्हेल शार्क (Whale Shark) आज आढळून आला आहे. यानंतर वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत व्हेल शार्क याच्या लांबी-रुंदीबद्दल माहिती घेतली. व्हेल शार्क हा समुद्र किनारी मृत अवस्थेत आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु व्हेल शार्क समुद्र किनारी दिसून आल्यानंतर नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून आली होती.(Two headed Russell’s Viper Rescued In Maharashtra: कल्याण येथे आढळला घोणस प्रजातीचा दुतोंडी विषारी साप; पाहा संपूर्ण व्हिडिओ)

व्हेल शार्क मृत अवस्थेत सापडल्याने या प्रकरणी आता अधिक तपास केला जाणार आहे. तर समुद्रातील महत्वाची म्हणून संपत्ती गणले जाणारे जसे व्हेल्स, डॉल्फिन्स आणि शार्क सारखे मोठे मासे सातत्याने मृत अवस्थेत आढळून येत असल्याचे मुख्य वन संरक्षक एन वासुदेवन यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसांपूर्वी वसईत 10 फूट लांबीचा डॉल्फिन मृत अवस्थेत आढळला होता. तर याच आठवड्यात मंगळवारी 6 फूट लांबीचा डॉल्फिन गोराई समुद्र किनारी मृत अवस्थेत मिळाला होता.(ठाणे: अर्नाळाच्या समुद्रात अडकलेल्या 16 मच्छिमारांची MRCC च्या पथकाकडून सुखरुप सुटका) 

दरम्यान, गेल्या दोन वर्षात जवळजवळ सहा व्हेल माशांचा मृतदेह आढळून आला आहे. हे सर्व व्हेल मासे महाराष्ट्रातील समुद्र किनारीच मृत अवस्थेत आढळले आहेत. तर सध्या व्हेल शार्क हा पालघर मधील शिरगावात येथे सापडला असून तो विघटीत अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे व्हेल शार्क याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्याचा मृत्यू कशामुळे झाले हे कळून येईल असे ही वासुदेवन यांनी म्हटले आहे.