कलिना भागात रस्त्याला तळ्याचं स्वरूप, पाईपलाईन फूटल्याने लाखो लीटर पाणी वाया

कलिना भागात लिकेज असल्याने पाईपलाईन फूटल्याची माहिती समोर आली आहे.

पाईपलाईन PhotoCredit : TWitter

मुंबईच्या रस्त्यांवर ऐन ऑक्टोबर महिन्यात पाण्याचं तळ साचलं आहे. सांताक्रुझ कलिना भागामध्ये मुंबई युनिव्हर्सिटी भागात पाण्याची पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. पाणी साचल्याने सांताक्रुझ भागात वाहतूकही मंदावली आहे. तसेच सांताक्रुझ पाण्यात पाणी पुरवठा कमी करण्यात आला आहे.

आज सकाळी सहाच्या सुमारास पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी रस्त्यावर आले आहे. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. पाईपलाईन फूटल्यानंतर या भागात पाण्याचा दाब कमी करण्यात आला आहे. तसेच काही भागात पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

लिकेज असल्याने पाईपलाईन फूटल्याची माहिती समोर आली आहे. यंदा महाराष्ट्रात निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अशा स्थितीत प्रशासनाच्या हलर्जीपणामुळे पाणी वाया जाणं ही बाब क्लेषकारक आहे.



संबंधित बातम्या