Washim Man Writes Letter to CM Uddhav Thackeray: मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या; वाशिमच्या युवकाची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

Washim Man Writes Letter to CM Uddhav Thackeray: वाशिममधील युवक गजानन राठोड (Gajanan Rathod) याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठवलेलं पत्र सध्या सर्वत्र चर्चचा विषय ठरलं आहे. या तरुणाने मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात गजानन राठोड यांने म्हटलं आहे की, 'माझं वय 35 वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण गेल्या 7 वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु, कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी असावी ही अट असते. तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण झाले आहे,' असंही गजानन राठोडने पत्रात म्हटलं आहे. (वाचा - CM उद्धव ठाकरे यांनी जुनाट रूढींना छेद देत IAS अश्विनी भिडे यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या टनेल बोरिंग मशिन शुभारंभचा नारळ वाढवला; सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव)

त्यामुळे आपण मला एकतर जॉब द्यावा. अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे, अशी नम्र विनंतीही गजाननने मुख्यमंत्र्यांना केली आहे. गजाननचे हे पत्र सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत आहे. तसेच सर्वत्र या पत्राची चर्चा रंगली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेकांनी पत्राद्वारे आपली व्यथा सांगितली आहे. (Bhandara Hospital Fire: राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटीस; भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील 10 बाळांच्या मृत्यू प्रकरणी मागितला अहवाल)

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील एका तरुणाने राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. मराठवाड्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, अशी मागणी या तरुणाने आपल्या पत्रात केली होती. विशेष म्हणजे या तरुणाने आपल्या मूळ गावापासून ते लालबागच्या राजापर्यंत दंडवत घालत पायी यात्रादेखील काढली होती. त्यामुळे या तरुणाचं पत्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरलं होतं.