वर्धा: पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारात स्फोट; ६ ठार, १० जखमी
स्फोट (Archived, edited, representative images)

Wardha - Explosion in Central Ammunition Store in Pulgaon: वर्धा येथील पुलगाव आज (मंगळवार, २० नोव्हेंबर) सकाळी एका भयंकर स्फोटाने दणानून गेले. केंद्रीय दारुगोळा भांडारात हा स्फोट घडला. या स्फोटात सहा जण ठार तर, दहा जण जखमी झाले. स्फोटके निकामी करत असताना हा स्फोट घडल्याची प्रातमिक माहिती आहे. देशातील सर्वात मोठा शस्त्रसाठा केंद्र पुलगाव येथे आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुलगावचे शस्त्रसाठा भांडार सुमारे २८ किलोमिटर परिसरात पसरले आहे. त्यामुळे येथे सुरक्षाव्यवस्थाही अगदी चोख असते. मात्र, तरीसुद्धा २०१६मध्ये येथे भीषण स्फोटाची घटना घडली होती. या वेळी स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल १६ जवान शहीद झाले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी स्फोट झाला. (हेही वचाा, अमृतसरमधील निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला; तिघांचा मृत्यू, दहाजण जखमी)

स्फोटके निकामी करत असताना हा स्फोट झाला. अचानक घडलेल्या स्फोटाने परिसर दणानून गेला. त्यामुले आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये कामालीची घबराच निर्माण झाली. घटनेची माहिती कळताच प्रशासन आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. स्फोट नेमका कसा झाला याबाबत पुढील तपास सुरु आहे.