Wardha Bus Fire: वर्धा जिल्ह्यात प्रवाशांना नेणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला लागली आग, बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप
त्यामुळे बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर काही वेळातचं संपूर्ण बसने पेट घेतला.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे धावत्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याची घटना आज घडली आहे. यावेळी प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पालोरा येथील पेट्रोलपंपानजीक ही दुर्घटना घडली आहे. ट्रॅव्हलर मध्ये एकूण 17 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी आता या आगीची कारणे शोधली जात आहेत. (हेही वाचा - Mumbai Fire: मुंबईतील धारावी येथे इमारतीला आग, सहा जण गंभीर जखमी)
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा घाडगे जवळील पालोरा येथील पेट्रोलपंपानजीक धावत्या ट्रॅव्हल्समधून अचानक धूर येत होता. त्यामुळे बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर काही वेळातचं संपूर्ण बसने पेट घेतला. या बस पूर्ण जळून खाक झाली आहे. ट्रॅव्हलर मध्ये एकूण 17 प्रवासी होते. चालकाने वेळीच प्रसांगवधान राखल्याने जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
ट्रॅव्हल्स शेगाव येथून दर्शन घेऊन नागपूरकच्या दिशेने जात होती. दरम्यान आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी आगीवर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बसचा बरचा भाग भागीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. दरम्यान तापमानात वाढ झाल्याने वाहनांना आग लागल्याच्या घटना घडत आहेत. मागील आठ दिवसात जिल्ह्यात चार ठिकाणी वाहनांना आग लागली आहे.