Anand Antarkar Passes Away: प्रसिद्ध लेखक आनंद अंतरकर यांचे आज निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Anand Antarkar (Photo Credit: Twitter)

प्रख्यात लेखक आणि 'हंस', 'मोहिनी', 'नवल' या साहित्यिक अंकांचे संपादक आनंद अंतरकर (Anand Antarkar) यांचे आज सकाळी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. रुग्णशय्येवरूनही ते शेवटच्या क्षणापर्यंत दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करीत होते. आनंद अंतरकर यांच्या निधनामुळे अनुभवी आणि मुद्रित मराठी नियतकालिकांचे एक अनोखे पर्व संपुष्टात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

आनंद अनंतकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रियदर्शिनी (कै. ग दि . माडगूळकर यांची कन्या), पुत्र अभिराम, कन्या मानसी आणि जावई सुप्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू आहेत. सुप्रसिद्ध सिनेपत्रकार अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर ह्या त्यांच्या भगिनी होत्या. हे देखील वाचा- नारायण राणे यांची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना; शिवसेना आमदाराची भाजप नेत्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

ट्वीट-

आनंद अंतरकर यांनी रुग्णालयात जाण्यापूर्वी यंदाच्या दिवाळी अंकाचे काम बव्हंशी पूर्ण केले आहे. 75 वर्षांच्या परंपरेनुसार तिन्ही नियतकालिकांचे ह्या वर्षीचे दिवाळी अंकसुद्धा वाचकांपर्यंत पोहचणार आहेत, अशी ग्वाही अभिराम अंतरकर ह्यांनी दिली.