Nagpur Rain And Hailstorm Updates: महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. ऐन जानेवारी महिन्यामध्ये थंडीचा पारा महाराष्ट्रात सर्वत्र खालावत असताना नागपूर, अमरावती, वाशिम, नांदेड,हिंगोली सह विदर्भात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील काही दिवस नागपूरमध्ये पावसाची हजेरी पहायला मिळाली आहे. आज सकाळी नागपूर शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहेत तर अमरावतीमध्ये गारपीट होत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी थंडीत कुडकडणार्या नागपूरकरांची आज (2 जानेवारी) मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासह मुंबईही गारठली; कमाल तापमानाचा पारा घसरला.
दरम्यान काटोल, सावनेरमध्ये गारापीट झाली आहे. तिवासा सह नागपूरमधील काही शहरांमध्ये आज सकाळी सोसाट्याच्या वार्यासह काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान या पावसामुळे कापूस, सोयाबीन, गहू, संत्र यांचे नुकसान झालं आहे.
नागपूर मध्ये गारपीट
Pics of #Nagpur nearby Villages..(Mohpa). pic.twitter.com/2y4ZU7kmzh
— himanshu gahukar (@himanshugahukar) January 2, 2020
पावसाची मुसळधार
#nagpur baarish bole mantich nahi aaj ! pic.twitter.com/HFpPlhB9mE
— Rj Divya (@MirchiDivya) January 2, 2020
नागपूर मध्ये मुसळधार पाऊस तर अमरावतीमध्ये गारपीट; पहा व्हिडिओ Watch Video
31 डिसेंबरला झालेल्या पावसामध्ये विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद वर्धा मध्ये झाली आहे. आज देखील दिवसभर पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच बोरा इतक्या आकाराच्या गारा पडत असल्याने विदर्भात मोठं नुकसान झालं आहे.