काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या रेट्यामुळेच राज्यात दुष्काळ जाहीर: अशोक चव्हाण
(Photo: Twitter)

मुंबई: जनसंघर्ष यात्रेच्या दबावामुळे सरकारला दुष्काळ जाहीर करावा लागला. हे जनसंघर्ष यात्रेचे यश आहे. राज्यात 201 तालुक्यातील 20 हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकारने फक्त 151 तालुक्यातच दुष्काळ जाहीर केला आहे. बाकीच्या 50 तालुक्यात दुष्काळ केव्हा जाहीर करणार?

फक्त दुष्काळ जाहीर करून चालणार नाही तर दुष्काळी उपाययोजना तात्काळ कराव्या लागतील. चारा छावण्या सुरु कराव्यात. शासकीय वसुली थांबवावी. वीजबिल माफ करावे. मागणीप्रमाणे टँकर सुरु करावेत. (हेही वाचा, महाराष्ट्रात तब्बल 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; 112 तालुक्यांत गंभीर परिस्थिती)

या सरकारचा मागील अनुभव चांगला नाही हे फक्त घोषणा करतात अंमलबजावणी नाही. दुष्काळी जनतेला मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव कायम ठेवेल.