उल्हासनगर मध्ये शाळेचं प्लास्टर पडून तीन मुलं जखमी, कॅमेऱ्यात कैद झाला थरार (Watch Video)
Slab Plaster Fells Down In Jhulelal School, Ulhasnagar (Photo Credits: Youtube, Facebook)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सोमवार पासून शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली. दोन महिन्यांची सुट्टी संपवून शाळकरी मुलं पुन्हा आपल्या वर्गांमध्ये दाखल झाली पण शाळा सुरु होऊन एक दिवस न होतोच तेव्हा उल्हासनगर (Ulhasnagar Camp 2) कॅम्प 2  मधील झुलेलाल शाळेच्या  (Jhulelal School) एका वर्गात अचानक स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडल्याचे समजत आहे. यामध्ये तीन मुले गंभीर जखमी झाल्याचे देखील समजत आहे. ही घटना मंगळवारी शाळा सुरु असताना घडली, त्यांनतर जखमी मुलांना प्राथमिक उपचार करून शाळेच्या प्रशासनाकडून घरी पाठवण्यात आले. जखमी मुलांमध्ये जिया टेकचंदानी (Jia Tekchandani), इशिका चुघ (Ishika Chugh) आणि दिया भतीजा (Dia Bhatija) यांचा समावेश आहे.

स्लॅब कोसळण्याची घटना घडल्यावर सुरवातीला इमारतीचा स्लॅब कोसळला अशी अफवा पसरली होती यावरून स्थानिक नेते व पालिका अतिक्रमण विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र तिथे गेल्यावर शाळेच्या एका खोलीचा स्लॅब कोसळल्याचे स्पष्ट झाले.

कॅमेऱ्यात कैद झाला थरार (Watch Video)

दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शालेय मुलांच्या सुरक्षेसाठी पालिकेने शाळा इमारतीचे ऑडिट सक्तीने करावे अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे सांगितले. पावसाळा सुरु झाल्यावर अनेक शाळांमध्ये छप्पर व भिंती कमकुवत झाल्या आहेत, यावर योग्य ती तरतूद करण्याची गरज आहे असेही राजेंद्र यांनी म्हंटले आहे .यावर उत्तर देताना झुलेलाल शाळा प्रशासनाने इमारतीचे एका ठिकाणचे प्लास्टर पावसामुळे पडले असून इमारत पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.