गुटखा विक्री विरुद्ध आता महाराष्ट्र पोलीस करणार कठोर कारवाई; राज्य सरकार ने दिली 'ही' परवानगी
Gutkha Ban In Maharashtra (Photo Credits: PTI and Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) यापुढे गुटखा (Gutkha Selling) खरेदी आणि विक्री च्या प्रकरणात स्वतंत्रपणे कारवाई करण्यासाठी पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार द्वारे हा महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आला. गुटखा व तत्सम पदार्थांवर राज्यात विक्रीला बंदी आहे मात्र तरीही अनेक ठिकाणी याची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकरणात यापूर्वी तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना खाद्य एवं औषध प्रशासन (एफडीए) ची परवानगी घ्यावी लागत होती मात्र आता यापुढे स्वतंत्ररित्या महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) अशा प्रकरणात गुन्हा दाखल करू शकणार आहेत. मुंबई: कांदा वाहतुकीच्या नावाखाली तब्बल 20 लाखांच्या गुटख्याची तस्करी; वाहनचालकाला अटक

प्राप्त माहितीनुसार, राज्यात अगोदरपासूनच असणाऱ्या गुटखा बंदी ची अंमलबजावणी अधिक कठोर रित्या करण्यासाठी राज्य सरकारद्वारे ही नवी योजना करण्यात आली आहे. यापुढे पोलीस गुटखा विक्रेते तसेच तस्करी प्रकरणात आढळणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करू शकणार आहेत. पोलीस महानिरीक्षक, मिलिंद भारंबे यांनी यासंदर्भात 16 जुलै रोजी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 5 जुलै रोजी एक विशेष बैठक पार पडली होती त्यात यासंदर्भात माहिती दिली गेली तसेच गुटखा विक्रेत्यांवर भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला जावा असेही सांगण्यात आले. 2012 पासून राज्यात गुटखा विक्रीला बंदी आहे.