Uday Samant Tests Negative for COVID-19: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची कोरोनावर मात; उद्यापासून करणार कामाला सुरुवात
Uday Samant | (Photo Credits: Twitter)

Uday Samant Tests Negative for COVID-19: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी कोरोनावर (Coronavirus) यशस्वीरित्या मात केली आहे. यासंदर्भात उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'आज केलेली कोविड टेस्ट आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने -ve आली. ब्लड टेस्ट देखील नॉर्मल आहेत. गेले काही दिवस मी पूर्ण विलगिकरणात होतो. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे उद्या पासून थोडं काम सुरू करत आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद हीच माझी शक्ती. असचं प्रेमराहू दे,' असंही सामंत यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, 29 सप्टेंबर रोजी उदय सामंत यांनी आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सांगितलं होतं. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सामंत यांनी स्वतः विलगिकरणात ठेवलं होतं. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनदेखील त्यांनी त्यावेळी केलं होतं. उदय सामंत यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकालादेखील कोरोनाची लागण झाली होती. (हेही वाचा - Eknath Shinde Recovers From COVID-19: महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात)

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, याच बरोबरीने कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. राज्यात शनिवारी 16 हजार 835 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 14 हजार 348 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत 11 लाख 34 हजार 555 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.3 टक्के आहे.