Police personnel Commits Suicide: गेल्या 24 तासात राज्यात दोन पोलिसांच्या आत्महत्या; पोलीस प्रशासात खळबळ

नुकतीच रायगड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुष्य संपवलं. रायगडची घटना ताजी असताना चंद्रपुरातही एका पोलीस शिपायाने जीवन संपवलं.

Maharashtra Police (Photo credit: archived, edited, representative image)

Police personnel Commits Suicide: राज्यात गेल्या 24 तासांत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे जीवन संपवले ( policeman committed suicide). त्यामुळे पोलिस प्रशासनात सगळं काही अलबेल नसल्याच्या चर्चांना उधान आले आहे. नुकतीच रायगड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुष्य संपवलं. रायगडची घटना ताजी असताना चंद्रपुरातही एका पोलीस शिपायाने जीवन संपवलं. सलग अशा घटना समोर आल्याने पोलिस वर्तुळात (Police Administration) खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी वर्ग हा नेहमीच मानसिक तणावातून जात असतो यास आपण परिचीत असतो. मात्र, जमतेचे संरक्षण करणारेच आत्महत्येसारखा मार्ग अवलंबत असतील तर ते संशयास्पद गोष्टींना पाठबळ देते.

रायगड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने सोमवारी आत्महत्या करून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली. राहुल कडू असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो रायगड जिल्हा पोलिस मुख्यालय येथे कार्यरत होता. सुधागड तालुक्यातील घोटवडे या आपल्या गावी आपल्या रहात्या घरी त्याने जीवन संपवलं. राहुल याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेने सर्वांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस वसाहतीत एका कर्मचाऱ्याने जीवन संपवलं आहे. अजय मोहूर्ले अस त्यांचे नाव होते घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या मृत पोलीस शिपायाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अजय मोहूर्ले याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज बल्लारपूर पोलिसांना आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातच एका पोलीस शिपायाने तणाव न सहन झाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ही तिसरी घटना घडली आहे. त्यानंतर जिल्ह्यात ही दुसरी घटना घडल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.