मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते वरळी येथील 2 नव्या कोव्हीड केंद्राचे लोकार्पण; आदित्य ठाकरे यांची माहिती
New COVID-19 Centres In Worli (Photo Credit: Twitter)

मुंबई (Mumbai) कोरोनाने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. मुंबईतील दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या हस्ते वरळी येथे 375 बेड असलेल्या दोन नवीन कोव्हीड-19 केंद्राचे (COVID-19 Centers) उद्घाटन करण्यात आले आहे. यासदंर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्यासह बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर, जी/दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष दत्ता नरवणकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, नगरसेविका हेमांगी वरळीकर, नगरसेवक संतोष खरात, उपआयुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आणि व्ही.सीच्या माध्यमातून माझ्या उपस्थितीत वरळी येथील पोद्दार रूग्णालयात 193 खाटांचे सीसी-1 व सीसी-2 कोव्हीड समर्पित विभागाचे तसेच नेहरु सायन्स सेंटर येथील 150 बेड्सच्या असलेल्या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हे देखील वाचा- Mumbai: LTT स्टेशनवर स्थलांतरित मजुरांची गर्दी? मध्य रेल्वे कडून 'ही उन्हाळ्यातील सामान्य गर्दी' म्हणत हे स्पष्टीकरण

आदित्य ठाकरे यांचे ट्वीट-

मुंबईत सोमवारी 6 हजार 905 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर मुंबई रविवारी 39 हजार 398 चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण 17.52 टक्के आहे. महत्वाचे म्हणजे, एकाच दिवसात नऊ हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. ज्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या रविवारच्या तुलनेत घटली आहे.