Shiv Jayanti 2023: शिवभक्तांसाठी खुशखबर! शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी; शिवजयंतीच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

यात खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यांचा समावेश असेल.

Shivaji Maharaj, Toll Naka (PC - Wikimedia Commons)

Shiv Jayanti 2023: यावर्षी शिवनेरी किल्ल्यावर शिवजंयती (Shiv Jayanti) साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातचं राज्य सरकारने शिवभक्तांना दिलासा देत शिवभक्तांनी टोलमाफ (Toll Free) करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे. यात खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यांचा समावेश असेल.

शिवजंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर यावर्षी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवजयंतीनिमित्त किल्ल्यावर शिवभक्तांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर याठिकाणी पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच किल्ले शिवनेरी येथील शिवजन्मोस्तव सोहळ्यासाठी वाहतूक आणि वाहनतळाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. (हेही वाचा -Shiv Jayanti 2023: शिवजयंती निमित्त सकाळी 6 ते रात्र 12 या काळात ध्वनीशेपकाची मर्यादा 15 दिवसांसाठी शिथील)

यावर्षी शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रातील लोकसंस्कृती आणि ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

शासनाकडून शिवनेरीवर होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. यंदा शिवकालीन गाव हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. तसेच यावेळी महाशिव आरतीचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, यंदा शिवरायांची 393 वी जयंती साजरी होणार आहे.