TikTok ची महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांसाठी तब्बल 5 कोटींची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार
TikTok चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार (Photo Credits-Twitter)

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने प्रत्येक देशावर महासंकट ओढावले आहे. तर अमेरिका, इटली सारख्या देशांना याचा सर्वाधिक फटका बसला असून बळींचा आकडा हजारांच्य पार गेला आहे. त्यामुळे सर्वत्र कोरोचे संकट असल्याने सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजारांच्या पार गेला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 हजाराच्या पुढे गेला आहे. त्यामुळे कोरोनाची सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्यासोबत परिवाराची सुद्धा काळजी घ्यावी. याच दरम्यान आता सोशल मीडियात व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या TikTok ने महाराष्ट्र सरकारला तब्बल 5 कोटींची मदत केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे *CM Uddhav Thackeray) यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी सर्वोतोपरी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. दुसऱ्या बाजूला पोलीस कर्मचारी आपले सुद्धा कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. याच दरम्यान टिकटॉकने महाराष्ट्राला 5 कोटींची मदत केल्याची ट्वीट करत माहिती दिली आहे. भारतात टिकटॉक सर्वात अव्वल स्थानी असून त्याचे करोडोच्या संख्येने युजर्स आहेत. मनोरंजनाचे उत्तम मार्ग म्हणून टिकटॉककडे सध्या पाहिले जात आहे. पण टिकटॉकने केलेल्या या मदतीचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.(Coronavirus: Swab Sample गोळा करताना अवघे 30 ते 40 सेकंद लागत असले तरी 'हे' प्रचंड जोखमीचं काम! महाराष्ट्रातील कोविड वॉरिअरने शेअर केलेला अनुभव वाचा)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ही मुंबई आणि पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. याच कारणास्तव आता मुंबई महापालिकेकडून महापालिकांच्या शाळेत क्वारंटाइनची सोय करण्यात येत आहे. त्याचसोबत नागरिकांना कोरोनासंबंधित विविध सुचना सरकारकडून दिल्या जात आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनमुळे राज्यात कोरोनाच वेग संथ होण्यास यश येत असल्याचे म्हटले होते.