Covid-19: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; पुण्यात एका दिवसात तिघांचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण भारतात हाहाकार माजवला आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही. यातच पुणे (Pune) येथे कोरोनामुळे एका दिवसात आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूने देशात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन दिवसात रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. आता राज्यातील रुग्णांची संख्या ही जवळजवळ 900च्या आसपास पोहचली आहे. महाराष्ट्र आता कोरोना व्हायरसच्या फेज ३च्या अगदी जवळच्या टप्प्यावर येऊन पोहचला आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवस हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देश अधिक लक्ष देत आहेत. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषय आणीबाणी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच पुण्यात कोरोनामुळे तिघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे पुणे शहरात घबराटजनक परिस्थिती निर्माण धाली आहे. हे देखील वाचा- Covid-19: नालासोपारा येथे कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे 38 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4421 वर पोहचली आहे. यातील 3981 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 326 जणांना उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केवळ महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 891 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 41 रुग्णांची कोरोनाच्या जाळ्यातून सुटका झाली आहे.