शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही, अशी तक्रार येता कामा नये; राष्ट्रीयकृत बँकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुचना
खरीप हंगामामध्ये बियाण्यांचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाण्यांच्या प्रकारांमध्ये कडक शिक्षा करण्यात येईल. राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा, अशा सुचनाही ठाकरे यांनी यावेळी दिल्या. याशिवाय 'शेतकऱ्यांना पिक कर्ज (Crop Loans) मिळत नाही, अशी तक्रार येता कामा नये, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज राज्यातील कृषि खरीप हंगाम कामांचा आढावा व बी बियाणे, खते, किटकनाशके, पिक कर्ज वाटप, कापूस, तुर व धान खरेदीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. खरीप हंगामामध्ये बियाण्यांचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाण्यांच्या प्रकारांमध्ये कडक शिक्षा करण्यात येईल. राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा, अशा सुचनाही ठाकरे यांनी यावेळी दिल्या. याशिवाय 'शेतकऱ्यांना पिक कर्ज (Crop Loans) मिळत नाही, अशी तक्रार येता कामा नये, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते. यंदा खरीप हंगामासाठी 43.50 लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती. त्यापैकी 40 लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे. तसेच 50 हजार मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा करण्यात येत आहे. (हेही वाचा - Kalyan Dombivali Mahanagarpalika Recruitment 2020: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 514 जागांसाठी भरती जाहीर; जाणून अर्ज करण्याची पद्धत)
राज्यात आतापर्यंत 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना बांधावर बियाणे देण्यात आले आहेत. तसेच सध्या 381 लक्ष क्विंटल कापूस खरेदी झाली असून 2 लाख शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी कृषी मंत्री दादा भुसे यांनी पिक कर्ज वाटपाला गती द्यावी, अशा सुचना दिल्या आहेत.