सीमा भागात राज्य सरकार मराठी महाविद्यालय सुरु करणार - उदय सामंत
Uday Samant | (File Photo)

सीमा भागामधील मराठी नागरिकांना ताकद देण्यासाठी मराठी अभ्यासक्रम तातडीने सुरु करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार मराठी महाविद्यालय (Marathi College) सुरू करणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली आहे.

दरम्यान, आज उदय सामंत यांनी कोरोनाच्या संकटामध्ये परीक्षा घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारला परीक्षा घ्यायच्या नाहीत, हा समज चुकीचा आहे. अचानक कोरोनाचं संकट दूर होणार आहे का? युजीसीने सगळ्या विद्यापीठांचा आढावा घ्यावा. रेड झोनमधील विद्यार्थी येऊन परीक्षा कशी देऊ शकतात, हे युजीसीने स्पष्ट करावं, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - गडचिरोलीसह राज्यातील शाळा 3 ऑगस्टपासून सुरू होणार; विजय वडेट्टीवार यांची माहिती)

यावेळी उदय सामंत यांनी सांगितलं की, कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी आम्ही परीक्षेची व्यवस्था केली आहे. यासाठी राज्यातल्या सर्व कुलगुरूंशी चर्चा करुन राज्य सरकारने निर्णय घेतला असल्याचंदेखील यावेळी सामंत यांनी स्पष्ट केलं.