नवीन सॉफ्टवेअर व्हेन्टिलेटरची संभाव्य गरज असलेल्या रूग्णांना ओळखण्यास करणार मदत
COVID-19 Hospital | Representational Image | (Photo Credits: PTI)

आता सॉफ्टवेअरद्वारे अतिदक्षता विभागात व्हेन्टिलेटरची संभाव्य गरज किंवा वेळेत सल्ला हवा असलेल्या रुग्णांना ओळखण्यास मदत होऊ शकते आणि आणीबाणीची स्थिती उदभवण्यापूर्वी आवश्यक व्यवस्था करता येते. कोविड सेव्हरिटी स्कोअर (सीएसएस) नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये अल्गोरिदम आहे जे पॅरामीटर्सच्या संचाचे मापन करते. हे प्रत्येक रुग्णासाठी प्री-सेट डायनॅमिक अल्गोरिदमनुसार अनेक वेळा स्कोअर नोंदवते आणि ग्राफिकल ट्रेंडमध्ये मॅपिंग करून कोविड तीव्रता स्कोअर (सीएसएस) देते. बाराकपोर, कोलकाता येथील 100 बेडच्या सरकारी कोविड केअर सेंटरसह कोलकाता आणि उपनगरामधील तीन समाज कोविड केअर सेंटरमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

महामारी दरम्यान अचानक आयसीयू आणि इतर आपत्कालीन गरजांचे व्यवस्थापन करणे हे रुग्णालयांसाठी एक आव्हान होते. अशा परिस्थितींत वेळेवर माहिती मिळाल्यास आरोग्य संबधी आपत्तीचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल.

दूरस्थ (रिमोट) तज्ञ डॉक्टरांकडून ‘सीएसएस’ वर नियमितपणे अनेकदा देखरेख ठेवली जाते. यामुळे प्रत्येक रुग्णासाठी लागणारा डॉक्टरांच्या सल्लामसलतीचा वेळ वाचतो आणि डॉक्टरांच्या प्रवासाची गरज कमी होते. आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर आणि रेफरल आवश्यक असलेल्या रूग्णांना लवकर ओळखण्यास मदत होते, गंभीर रुग्णांसाठी मदतीची आवश्यकता असल्यास रेफरल कमी करता येते आणि अशा प्रकारे रूग्णालयात अधिक बेड उपलब्ध करता येतात. ज्यांना उपचार परवडत नाहीत किंवा लहान घरांमध्ये अलगीकरणात राहू शकत नाहीत अशा रुग्णांना देखरेखीसह वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्यात यामुळे मदत होईल. केवळ बेड्स आणि ऑक्सिजन सहाय्य असणार्‍या मात्र व्हेन्टिलेटर्सची सुविधा नसलेल्या ‘कोविड केअर सेंटर’ साठी ही सुविधा एक मोठा आधार ठरू शकते.