Covid-19 चे संकट अजून टळले नाही; मुंबई, पुण्यासह 10 जिल्ह्यांतील कोरोना पॉझिटिव्हिटी दर जास्त, आरोग्य विभागाने व्यक्त केली चिंता
coronavirus | Representational image | (Photo Credits: PTI)

सार्वजनिक आरोग्य विभागाने (Public Health Department) गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या सादरीकरणात सांगितले की, कोविड-19 चे संकट अजून कायम आहे, कारण राज्यातील 10 जिल्ह्यांमधील साप्ताहिक सकारात्मकता दर राज्याच्या सरासरी 23.48% पेक्षा जास्त आहे. याशिवाय, पुणे महानगरपालिका, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सांगली आणि पुणे ग्रामीणमध्ये 2074 ओमायक्रॉन व्हेरिएंट प्रकरणांसह महाराष्ट्र इतर राज्यांमध्ये अव्वल आहे. नाशिकमध्ये साप्ताहिक सकारात्मकता दर 38.98% इतका उच्च आहे.

नाशिकनंतर, पुणे 38.54%, रायगड 30.61%, अकोला 30.22%, नांदेड 27.75%, वर्धा 27.71%, ठाणे 27.07%, नागपूर 25.68%, सांगली 24.94, सिंधुदुर्ग 23.56% यांचा नंबर लागतो. शिवाय, 13 ते 19 जानेवारी दरम्यान नोंदलेल्या 2,87,421 पैकी एकूण नवीन कोविड 19 प्रकरणांपैकी पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून 2,06,308 प्रकरणे आहेत तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये 81,113 प्रकरणे आहेत.

द इंडियन एक्स्प्रेसने ऍक्सेस केलेल्या डेटावरून असे दिसून येते ,की ग्रामीण भागातील वाढत्या संसर्गाच्या दरामुळे नंदुरबार (17 टक्के), लातूर (18.7 टक्के), सांगली (19.8 टक्के) आणि सातारा (19.7 टक्के) मध्ये सात दिवसांचा सकारात्मकता दर 15 टक्क्यांहून अधिक झाला आहे, जो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 5-7 टक्क्यांवर होता. (हेही वाचा: Corona Vaccination Update: गेल्या 15 दिवसात ठाण्यात 15 ते 18 वयोगटातील 45.68% मुलांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस)

राज्यात 14,47, 81,440 लसीचे डोस देण्यात आले असून, त्यात 8,52,93,814 पहिला डोस, 5,90,23,045 दुसरा डोस आणि 4,63,581 बुस्टर डोस आहेत. 19 जानेवारीपर्यंत जवळपास 96,33,16 जणांचा पहिला डोस बाकी आहे. कोविशील्डच्या दुसऱ्या डोसच्या बाबतीत, 97,32,149 पात्र लाभार्थींनी अद्याप तो घेणे बाकी आहे, तर 17,41,246 जणांना राज्यात कोवॅक्सिनचा दुसरा डोस देणे बाकी आहे.