ठाणे:  पावसामुळे खडवली व जु गावात इमारतीतात 30 ते 35 जण अडकले, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर दाखल
Monsoon Rain In Maharashtra,Image For Representation (Photo Credits: ANI)

ठाणे(Thane)  जिल्ह्यात पावसाच्या हाहाकारामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. News१८ लोकमतच्या माहितीनुसार, खडवली व जु गावातील रहिवाशी इमारतींमध्ये पाणी शिरल्याने जवळपास ३० ते ३५ जण इमारतीतात अडकून पडल्याचे समजत आहे.आतापर्यंत यातील २० जणांना ह्रलिकॉप्टरच्या मातीने ठाण्यातील कोलशेत येथील बेसवर आणण्यात आले आहे. तर दुसरीकडे कल्याण भिवंडी मधील काही गावांशी संपर्क तुटला आहे. या नागरिकांच्या बचावासाठी घटनास्थळी एनडीआरएफचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे, मात्र हवामानातील अडथळ्यामुळे बचावकार्याची गती मंदावत आहे.

दरम्यान, ठाणे शहर पोलिसांनी या काळात नागरिकांना संयमाने वागण्याची विनंती केली आहे. काही वेळांपूर्वी एका ट्विटच्या माध्यमातून पोलिसांनी कामाची माहित दिली होती, ज्यानुसार, ठाणे, पालघर, भिवंडी, कल्याण- डोंबिवली, अंबरनाथ , बदलापूर, उल्हासनगर भागात पोलीस स्थानकात हाय अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या सर्व नागरिकांशी संपर्कात राहून बचावकार्य आरंभण्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ठाणे पोलीस ट्विट

दोन दिवसांपासून मुंबईसह ठाणे जिल्ह्याला सुद्धा पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यावेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच आहे त्याठिकाणी सुद्धा सुरक्षित राहण्याचे पोलिसानी आवाहन केले आहे.