ठाणे येथे पोलिसावर चाकूहल्ला केल्याने जखमी, दोन जणांना अटक
फोटो सौजन्य - PTI

ठाणे (Thane) येथील भिवंडीत एका 52 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यावर दोन व्यक्तींकडून चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी घडली असून या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी आज अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रफुल्ल दळवी असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते भोईवाडा पोलीस स्थानकात कार्यकरत आहेत. तर बकरी ईद निमित्त ते ड्युटीवर होते.(रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह डोंबिवलीतील खाडीत सापडला)

एका व्यक्तीवर भंडारी कंम्पाउंट परिसरात मारहाण करण्यात आल्याची पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी दळवी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करु लागले. त्याचवेळी दोन अज्ञात व्यक्तींनी दळवी यांच्यावर चाकू हल्ला केल्याने ते जखमी झाले. यावर दळवी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपींनी पोलिसावर हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. परंतु पोलिसांनी या दोन जणांचा शोध घेत त्यांना येऊर परिसरातून रविवारी अटक केली आहे. या आरोपींच्या विरोधात विविध कायद्याअंतर्गत भोईवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Coronavirus Lockdown in Thane: ठाणे जिल्ह्यामध्ये कंटेन्मेंट झोन साठी लॉकडाऊन 31 ऑगस्ट पर्यंत कायम!)

दरम्यान, सध्या कोरोनाच्या संकट काळात पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर गस्त घालताना दिसून येत आहेत. तसेच नागरिकांना घरातच थांबवण्याचे आवाहन करत आहेत. तरीही नागरिकांकडून पोलिसांवर हल्ले केल्याचे प्रकार थांबत नसल्याचे दिसून येत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांवर हल्ले केल्यास कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.  तसेच आतापर्यंत पोलिसांकडून लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हजारोंच्या संख्येने गुन्हे दाखल करण्यासह वाहाने सुद्धा जप्त केली आहेत.