ठाणे येथे आणखी 309 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 5 हजारांच्या पार
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते परंतु नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. याच दरम्यान, ठाणे येथे आणखी 309 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 5387 वर जाऊन पोहचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यात आतापर्यंत साडेतीन लाख कोरोनाच्या चाचण्या पार पडल्या आहेत. तसेच 33 हजार 786 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी कोविड आणि क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले आहेत. कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी शिस्त पाळल्याने कोरोनाचे आकडे आटोक्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.(ठाणे: तुरुंगात तैनात पोलिसांची COVID-19 ची मोफत चाचणी करावी; शिवसेना खासदार राजन विचारे यांची जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी)

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 47910 वर पोहचला असून त्यापैकी 1577 जणांचा बळी गेला आहे. तसेच 13404 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार विभागणी करण्यात आली आहे. तर विविध ठिकाणची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे नियम शीथिल करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा वेग संथ झाला असला तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.