ठाणे: टीएमसीच्या बस स्थानकाजवळ होर्डिंग कोसळले, पावसाळ्यात नागरिकांनी सुरक्षेबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

ठाणे (Thane) येथील टीएमसीच्या बस स्थानकाजवळ (TMC Bus Stand) एक मोठे होर्डिंग पडल्याची घटना आज (13 जून) घडली आहे. परंतु होर्डिंग पडल्याने त्यावेळी तेथे आजूबाजूला कोण नसल्याने कोणतीही जीवतहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या चक्रीवादळाचा परिणाम हळूहळू मुंबईला सुद्धा बसत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून झाडे आणि बोर्ड पडल्याच्या घटना घडत आहेत. तर टीएमटीच्या येथे असणारे फलक हे लोखंडी ब्रॅकेट्सने बांधलेले होते तरीसुद्धा ते खाली कोसळले. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षेबाबत सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

(मुंबई: चर्चगेट स्टेशन जवळ होर्डिंग कोसळून मृत पावलेल्या मधुकर नार्वेकर यांच्या कुटुंबियांना पश्चिम रेल्वेची मदत)

या प्रकरणी कोणीही जखमी झालेले नाही. मात्र धोकादायक इमारती, झाडे यांच्यापासून पावसाळ्यात दूर रहावे. तसेच पावसाळ्यात धोकादायक गोष्टींमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून पालिकेकडून कार्य सुरु करण्यात आले आहे.