Sushant Singh Rajput Case: सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष काढला नाही ही अभिमानाची बाब- गृहमंत्री अनिल देशमुख
Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: ANI)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्णयाचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी स्वागत केले आहे. आम्ही सीबीआयला आवश्यक सहकार्य करु. तसंच मुंबई पोलिसांच्या तपासात सुप्रीम कोर्टाने कोणताही दोष काढला नाही ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे म्हणत असे ते म्हणाले. दरम्यान मुंबई पोलिस देखील सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करणार का? असे विचारले असता सुप्रीम कोर्टाच्या आदेश कलम 24 नुसार राज्य सरकार विचार करेल असे गृहमंत्री म्हणाले. (महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा; सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणी)

दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय जाहीर करत सुशांतचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. (सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रीया; दोषींना शिक्षा होणार असा व्यक्त केला विश्वास)

ANI Tweet:

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे सुशांतच्या कुटुंबाकडून, चाहत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. तर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे सह इतर बॉलिवूड कलाकारांनी देखील ट्विट करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर सुशांतच्या कुटुंबियांनी देखील सीबीआयकडे तपास सोपवल्याने आता दोषींना नक्कीच शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.