सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करत प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून येईल अशा शब्दांत केले ट्विट, नक्की वाचा
NCP MP Supriya Sule | (Photo courtesy: facebook / supriyasule)

महाराष्ट्रात गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा टाकत आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्या या या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी 2 लाखांहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. तसेच चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करत खास ट्विट केले आहे.

या ट्विटच्या माध्यमातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आजच्या दिवसाचे महत्व सांगत प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून येईल अशा शब्दांत ट्विट केले आहे.

पाहा सुप्रिया सुळे यांचे ट्विट:

 

हेदेखील वाचा- Uddhav Thackeray Oath Taking Ceremony Live Updates: आजचा सूर्योदय नवा इतिहास रचतोय; सुप्रिया सुळे यांच्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

'आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु. अभिनंदन!' अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते स्वगृही परतले आहेत. त्यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंसोबत अजित पवारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.

आतापर्यंत ज्या शिवतीर्थावर (Shivtirth) शिवसेनेचे अनेक कार्यक्रम पार पडले, तिथेच उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा भव्य सोहळा आयोजित केला गेला आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील तमाम नेत्यांना आमंत्रित केले गेले आहे. सोनिया गांधी यांना खास निमंत्रण देण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट दिल्ली येथे घेतली.  या सोहळ्याचे भव्य स्वरूप पाहता मुंबई पोलिसांकडून आजच्या कार्यक्रमासाठी तब्बल 2000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. ही माहिती पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी दिली.