Supreme Court: शिंदे सरकारच्या भवितव्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, काय होणार फैसला?
Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

शिंदे सरकारसंबंधी (Shinde Governemnt) आज महत्वाची सुनावाणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीवर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना नोटीस बजावत 48 तासात नोटीसीचे उत्तर देण्यास सांगितले होते. पण या नोटिशीला उत्तर न देता या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज संबंधीत याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या येणाऱ्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. तसेच  सर्वोच्च न्यायालय फक्त 16 आमदारांचा प्रश्न नसुन यासंबंधित विविध बाबींवर निर्णय देण्याची शक्यता आहे.

 

शिवसेनी प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील गटनेता, व्हिप म्हणून विधानसभा (Vidhan Sabha) किंवा लोकसभेत (Loksabha) शिंदे गटाने केलेल्या नेमणुका अवैध ठरवण्याची मागणी केली होती. उध्दव ठाकरेंची ही मागणी लक्षात घेता सर्वोच्च न्यायालय या बाबींना विशेष लक्षात घेता सुचक निर्णय द्यावा लागणार आहे. तसेच   विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधातला अविश्वास प्रस्ताव वैध की अवैध यासंबंधीचा  निर्णय देखील सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. ठाकरे विरुध्द शिंदे ही लढाई थेट निवडणूक आयोगातही (Election Commission) पोहोचली आहे. 8 ऑगस्टपर्यंत दोन्ही बाजूंना म्हणजे शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांना देखील उत्तर द्यायचं आहे. पण सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण होईपर्यंत आयोगाच्या नोटिशीला स्थगिती द्या या उद्धव ठाकरे गटाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयास उत्तर द्याव लागणार आहे. (हे ही वाचा:- Uday Samant: ‘अशा’ भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही, पुण्यात काल झालेल्या हल्ल्यानंतर उदय सामंत यांची खोचक प्रतिक्रीया)

 

आजच्या या महत्वपूर्ण सुनावणी दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. 4 ऑगस्ट म्हणजे उद्या पर्यत त्यांना न्यायालयाने ईडीची कोठडी सुनावण्यात आली  आहे. तरी संजय राऊतांच्या गैरहजरीचा आणि सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या आजच्या सुनावणीवर काही परिणाम होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.