रत्नागिरी जिल्ह्यात सुकवली, बहिरवली, चौगुले मोहल्ला, रजवेल, शिर्शी या गावांत ग्रामपंचायत निवडणूक,  6 फेब्रुवारीला मतदान
Voting | Representational Image (Photo Credits: Getty Images)

Gram Panchayat Elections 2020 In Ratnagiri District: रत्नागिरी जिल्ह्यातील पाच ग्रामपंचातींची मुदत येत्या काही काळात संपत असल्याने या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक (Gram Panchayat Elections 2020) पार पडणार आहे. सुकवली (Sukivali), बहिरवली (Bahiravali Gram Panchayat) , चौगुले मोहल्ला (Chaugule Mohalle Gram Panchayat), रजवेल (Rajvel Gram Panchayat) आणि शिर्शी (Shirshi Gram Panchayat) अशी या ग्रामपंचायतींची नावे आहेत. या पाचही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 6 फेब्रुवारी 2020 रोजी मतदान पार पडत आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 फेब्रुवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.

सुकवली, बहिरवली, चौगुले मोहल्ला, रजवेल आणि शिर्शी या पाचही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे येत्या 16 ते 21 जानेवारी 2020 या काळावधीत स्विकारली जाणार आहेत. या कालावधीत शासकीय सुट्टी येत असल्यास किंवा आल्यास नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाही. प्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी 22 जानेवारी 2020 या दिवशी होईल. तर, छाननीत कायदेशीर पडताळणीनुसार योग्य ठरलेली नामनिर्देशनपत्रे उमेदवारीसाठी गृहीत धरली जातील.

दरम्यान, छाननीत योग्य ठरलेली नामनिर्देशनपत्र 24 जानेवारी 2020 पर्यंत मागे घेता येतील. तसेच, 24 जानेवारी 2020 या दिवशीच उमेदवारांना निवडणूक चिन्हांचेही वाटप केले जाईल. त्यांतर थेट 6 फेब्रुवारी 2020 या दिवशी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडेल. या मतदानाची मतमोजणी 7 फेब्रुवारी 2020 या दिवशी पार पडेल. (हेही वाचा, सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पद निवडणूक 2019: शिवसेना पराभूत; नारायण राणे समर्थक भाजप उमेदवार संजू परब विजयी)

महाराष्ट्र डीजीआयपीआर ट्विट

दरम्यान, 18 वर्षे पूर्ण असलेल्या आणि मतदार यादीत नाव असलेला तसेच, निवडणूक आयोगाने मतदानाचा अधिकार कायम ठेवलेल्या अशा कोणत्याही मतदारास मतदानाचा हक्क आहे. मात्र, तो मतदार मतदान करत असलेल्या गावचा तसेच, ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असावा. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जाहीर झालेल्या संबंधीत निवडणुकीच्या अधिकृत मतदार यादीत त्या मतदाराचे नाव असणे आवश्यक आहे. मतदानासाठी ओळखपत्र म्हणून मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ड, वाहन चालविण्याचा परवाना अथवा ओळखीचा सबळ पुरावा देणारे सरकारमान्य कादगपत्र सोबत असणे आवश्यक आहे.