Aslam Shaikh: संजय राऊतांनंतर किरिट सोमय्यांचं पुढील टार्गेट अस्लम शेख? मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस जारी
Aslam Shaikh (Photo Credits: ANI)

अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ताब्यात घेतले आहे.  पत्राचाळ घोटाळ्या (Patra Chawl Scam) प्रकरणी संजय राऊतांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तर संजय राऊतांपाठोपठ आता कॉंग्रेसचे नेते अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर देखील  गंभीर कारवाई होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) पर्यावरण मंत्रालयानं (State Environment Ministry) मढमधील (Madh Studio Scam)) कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी नोटीस अस्लम शेख यांना नोटीस बजावण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणी पर्यावरण विभागाने (Environment Department) मुंबई (Mumbai Collector)) जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला (BMC) कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरी जारी केलेल्या नोटीसीवर अस्लम शेख काय प्रतिक्रीया देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

 

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांवर ईडीची कारवाई होण्यापूर्वी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याबाबत भाकित केलं होतं. तर यावेळी देखील किरीट सोमय्या यांनी या संबंधीत सुचक ट्वीट (Tweet) करत या सगळ्या प्रकाराची माहिती दिली आहे. किरीट सोमय्यांनी या ट्वीटमध्ये नमूद केले आहे की, मढ मार्वे ₹1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडून कॉंग्रेस नेते असलम शेख यांना नोटीस (Notice) जारी केलेली आहे. तसेच मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरी  मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे असं ट्वीट भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख विरोधात केलेलं आहे. (हे ही वाचा:- Saamana Article: मुख्यमंत्री पदाची वरमाला गळ्यात घातली पण मंत्रीमंडळ जन्माला आलं नाही, सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर हल्लाबोल)

 

गेल्या आठवड्यातचं काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते मोहित काम्भोज (Mohit Kamboj) देखील आहेत. तेव्हा देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे मढ मार्वे ₹1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी अस्लम शेख आता काय भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.