Ganpati Visarjan 2022: गणपती विसर्जनानिमित्त मध्यरात्री विशेष 10 लोकल धावणार, मध्य रेल्वेचं गणेशभक्तांना विशेष गिफ्ट
Mumbai Local | Representational Image | (Photo credits: PTI)

गणपती विसर्जन म्हणटली (Ganpati Visarjan 2022) की उत्साहचं. विशेष म्हणजे मुंबईतील (Mumbai) गणपती विसर्जन (Mumbai Ganpati Visarjan) अनोखाचं. मुंबईतील गणपती विसर्जनसाठी केवळ देशभरातून नाही तर परदेशातूनही बाप्पाचे भक्त मुंबईत (Mumbai) हजेरी लावतात. दरम्यान मुंबईत मोठी गर्दी असते. मुंबईतील विविध भागात सार्वजनिक मंडळाकडून गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात येते. बाप्पाला अलविदा करण्यासाठी गणेशभक्त विशेष दक्षिण मुंबईत (South Mumbai) दाखल होतात. तरी गणपती विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) पार्श्वभुमिवर मुंबई लोकलसंबंधी (Mumbai Local Railway) रेल्वे प्रशासनाकडून विशेष निर्णय घेण्यात आला आहे. गणपती विसर्जनानिमित्त मध्यरात्री देखील विशेष 10 लोकल (Local Train) धावणार रेल्वे चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून (Central Railway) गणेशभक्तांना हे विशेष गिफ्ट देण्यात आलं आहे.

 

मध्यरात्री लोकल रेल्वे (Local Train) फक्त अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबरला मध्यरात्री विशेष लोकल (Midnight Special Local) चालविण्यात येणार आहे. उत्सवकाळातील गर्दीमुळे (Crowd) गणरायाचे दर्शन घेणे शक्य होत नाही, असे भाविक विसर्जनाच्या दिवशी दर्शन घेण्याचे नियोजन करतात. दादर (Dadar), गिरगाव (Girgaon) चौपाटीवर विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखो नागरिक येतात. या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कल्याण (Kalyan), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल (Panvel) दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा या विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत.

 

तरी मध्य रात्री धावणाऱ्या या 10 विशेष लोकल मेन लाईन अप (Main Line Up), मेन लाईन डाऊन (Main Line Down), हार्बर लाईन अप (Harbour Line Up) आणि हार्बर लाईन डाउन (Harbour Line Down) या मार्गावर धावणार आहेत. तरी ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), नवी मुंबई (Navi Mumbai) भागात राहिवाशी असलेल्या नागरिकांना या 10 स्पेशल लोकल (Local) सोयिस्कर ठरणार आहेत.