महापालिका अधिकाऱ्यांना मागितलेली कथीत खंडणी (Ransom ) आणि अर्वाच्च भाषेत शिवागाळ यामुळे सोलापूरेच उपमहापौर राजेश काळे (Rajesh Kale, Deputy Mayor of Solapur) चांगलेच अडचणीत आले आहे. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी असताना आपल्याच उपमहापौरांना बडतर्फीची नोटीस पाठविण्याची वेळी भाजपवर आली आहे. राजेश काळे (Rajesh Kale) यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षानी केली होती. परंतू, आता स्वपक्षीयांकडूनही काळे यांच्या बडतर्फीची मागणी झाली आहे. त्यामुळे सोलापूर भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी राजेश काळे यांना बडतर्फीची नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.
काय आहे प्रकरण?
उपमहापौर राजेश काळे यांच्यावर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडणी ( Deputy Mayor Ransom Case Solapur) मागितल्याचा आरोप आहे. तसेच, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर,उपायुक्त धनराज पांडे,विभागीय अधिकारी नीलकंठ मठपती आदींना काळे यांनी अर्वाच्च भाषेत शिविगाळ केल्याचा आरोपही आहे. काळे यांनी संबंधितांना कथीत शिविगाळ करतानाचे एक फोन रेकॉर्डींग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी राजेश काळे यांच्या विरोधात पोलिसांमध्येगुन्हा दाखल झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते. (हेही वाचा, Bhagirath Bharat Bhalke: भगिरथ भारत भालके यांची श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी निवड, शरद पवार यांचा शब्द ठरला अंतिम)
प्राप्त माहितीनुसार, सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांनी बजावलेल्या नोटीशीत काळे यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. पक्षाने या आधीही आपल्याला बेकायदेशीर कृत्यांबद्दल नोटीस बजावल्या होत्या. अनेकदा समज देऊनही आपण आपल्या कृती आणि कृत्यांमध्ये बदल केला नाही. आफल्यात कोणताही फरक पडत नाही. अनेकदा सांगूनही आपण ऐकले नाही. महापालिका अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन आपण भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे येत्या 24 तासाच्या आत आपण खुलासा करवा. आपल्याला पक्षातून बडतर्फ का करु नये? असा सावाल काळे यांना पाठवलेल्या नेटीशीत पक्षाने विचारला आहे.