पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय संन्यास घेतल्यास राजकरण सोडणार, स्मृती इराणी यांचा दावा
स्मृती इराणी (फोटो सौजन्य-ANI)

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी रविवारी (3 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  हे ज्या दिवशी राजकरणात संन्यास घेतील त्याच दिवशी आपण ही राजकरण सोडणार असल्याचा दावा केला आहे.त्यावेळी स्मृतीजी वर्ड्स काऊंट महोत्साव बोलत होत्या. ज्यावेळी एका श्रोत्याने त्यांना विचारले की, केव्हा प्रधान सेवक बनणार? असा प्रश्न उपस्थिक केला. दरम्यान, या शब्दाचा उपयोग खुद्द मोदी स्वत:साठी करतात.

त्यावर स्मृती इराणी यांनी असे म्हटले की, कधीच नाही. मी राजकरणात उत्तम असलेल्या नेत्यांसोबत काम करण्यासाठी राजकरणात आली आहे. तसेच मी खुप सौभाग्यशाली असून दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली होती.तर आता मोदी यांच्या सोबत काम करत आहे. त्याचसोबत ज्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजकरणातून सन्यास घेतील त्याच क्षणी मी सुद्धा राजकरणातून बाहेर पडणार आहे.

भाजप पक्षातील एक मुख्य नेताच्या रुपात स्मृति इराणी यांना ओळखले जाते. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना कठीण टक्कर दिली मात्र इराणी यांचा पराभव झाला होता. तसेच राफेल मुद्द्यावरुन संसदेत दिलेल्या भाषणामुळे स्मृति इराणी सध्या चर्चेत आहेत.