शिवसेना आमदारांसाठी 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये 80 रूम बूक; सहा दिवसांचा त्यांचा एकूण खर्च ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Uddhav Thackeray, Hotel The Retreat (Photo Credits: Facebook)

प्रत्येक राजकीय पक्ष आमदारांची फोडाफोडी रोखण्यासाठी अथक प्रयत्न करताना दिसत आहे. अशा परिस्तिथीत शिवसेना (Shivsena) पक्षाचे सर्व आमदार मागील काही दिवस मुंबईच्या 'द रिट्रीट' (Hotel The Retreat) या हॉटेलात राहत होते. आणि त्यांची राहण्याची उत्तम सोय व्हावी यासाठी शिवसेनेने लाखो रुपये खर्च केल्याची चर्चा होत आहे.

निवडणुकीचे निकाल लागल्यावर शिवसेनेने सर्वात आधी आपल्या आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवलं होतं. परंतु तिथे गैरसोय झाल्याने पक्षाने आपल्या सर्व आमदारांना तिथून हलवून 'द रिट्रीट' या हॉटेलात नेले. एकूण 56 आमदारांसाठी पक्षाकडून 80 रूम्स बुक करण्यात आल्या होत्या.

'द रिट्रीट' हॉटेलमधील एका रूमची किंमत एका रात्रीसाठी जवळपास साडेतीन हजाराहून जास्त आहे. आणि शिवसेनेने या सर्व आमदारांना तब्बल 6 दिवसांसाठी या हॉटेलात ठेवले होते. त्यामुळे 80 80 रुमचे 6 दिवसांचे भाडे 14 लाख रुपयांपेक्षा अधिक झाले आहे (Hotel Retreat Bill of Shivsena MLA). याचाच अर्थ पक्षाला आपल्या आमदारांना फुटू न देण्यासाठी खूप मोठी रक्कम चुकवावी लागली आहे.

सत्ता स्थापनेच्या संघर्षात 'या' स्थळांचा वाटा असेल महत्त्वाचा; मातोश्री, सिल्वर ओक की वर्षा कोणतं ठिकाण ठरेल अव्वल?

दरम्यान 13 नोव्हेंबरला या सर्व आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपआपल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले. परंतु त्या आधी 12 नोव्हेंबरला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'द रिट्रीट'मध्ये जाऊन सर्व आमदारांची भेट घेतली आणि स्वतः तिथे मुक्कामासाठी राहिले होते.