'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव' पुस्तकातून शिवाजी महाराजांबाबतच्या लेखनावर टीका, बंदी घालण्याची भाजप कडून मागणी
शिवाजी महारांचे पुस्तक (Photo Credits-Twitter)

रयतेचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या 19 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभुमीवर 'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव' नावाचे एक पुस्तक प्रदर्शित करण्यात आले आहे. या पुस्तकावरुन आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांच्या पुस्तकातील लेखनावरुन आता टीका करण्यात आली असून भाजपने त्यावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.महाराजांच्या पुस्तकातून त्यांच्याबाबत आक्षेपार्ह, दर्जाहिन आणि अपमानजनक लेखन करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

पुस्तकातून शिवाजी महाराज हे महान व्यक्ती नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकातून शिवाजी महाराजांच्यांबाबत चुकीच्या गोष्टी लिहिण्यात आल्याने त्याच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपने पत्र लिहित शिवजयंती पूर्वीच या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी असे सांगितले आहे. अमरावती मधील स्थानिक पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करत लेखक आणि प्रकाशनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावी असे म्हटले आहे.भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात आज पहिले अमरावती येथे पोलीस आयुक्त्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नागपुरात पत्रकार परिषद घेत भाजपने या पुस्तकावर कारवाईची मागणी केली आहे.('तुमच्यात हिंमत असेल तर, पुन्हा निवडणूक लढू...' विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान)

यापूर्वी दिल्लीत 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे पुस्तकाचे नाव होते. त्यावर शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करत प्रदर्शित करण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी ही पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.