कलम 370 आणि राम मंदिर प्रश्नाचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 शी संबंध काय? शिवसेना नेते संजय राऊत यांची भाजपाच्या प्रचारावर टीका
Sanjay Raut (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या मतदानानंतर आता राज्यात सार्‍यानांच मतदान निकालाचे वेध लागले आहे. राज्यात एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा सत्तेच्या चाव्या शिवसेना-भाजपा युतीच्या हातामध्ये जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यावरून शिवसेना-भाजपाच्या पारड्यात किती जागा पडणार यावरून अंदाज वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक 2019 साठी शिवसेना - भाजपा एकत्र निवडणूकीला सामोरे गेले होते. मात्र आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाच्या प्रचारावर टीका केली आहे.

भाजपाने राज्यात विधानसभा निवडणूक 2019 ज्या मुद्द्यांवर लढवली त्यांच्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. कलम 370 आणि राम मंदिर या मुद्द्यांवरून लोकसभा निवडणूक लढली आणि जिंकली पण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि या मुद्द्यांचा काय संबंध असे संजय राऊत म्हणाले आहेत.

ANI Tweet  

महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांवर 21 ऑक्टोबर दिवशी मतदान पार पडले तर 24 ऑक्टोबर दिवशी निवडणूक निकाल जाहीर केला जाणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा,शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.