समृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव ? भाजपासमोर पेच
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यासाठी माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनीदेखील कडाडून विरोध करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला 'समृद्धी महामार्ग' मुंबई - नागपूरला जोडणारा मोठा महामार्ग आहे. आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या हस्ते या महामार्गाचे भूमीपूजन करून काम सुरू केले जाणार आहे. मात्र या महामार्गाला नेमके कोणाचे नाव द्यायचे ? हा पेच भाजपासमोर पडला आहे.
एकीकडे भाजपाला समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयींचं नाव द्यायचे आहे तर दुसरीकडे शिवसैनिकांकडून या महामर्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यासाठी माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनीदेखील कडाडून विरोध करण्यात आला आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास विरोध दर्शवला आहे. समृद्धी महामार्ग या नावामध्ये काय वाईट आहे ? असे देखील म्हटले आहे.
१९९५ मध्ये राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर मुंबई पुणे हा द्रुतगती महामार्ग आला. त्यापाठोपाठ आता मुंबई नागपूर महामार्गाची सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता महामार्गाचे शिल्पकार असणार्या बाळासाहेबांच्या कार्याचा सन्मान व्हावा या उद्देशाने समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचेच नाव देण्याचा प्रस्ताव पुढे येत असल्याने भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा श्रेयवादाची लढाई रंगणार आहे.