शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब कांबळे यांचे मताधिक्य घ्या जाणून
2014 च्या निवडणुकीवेळी वातावरण वेगळे होते. काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार विरोधात लाट होती. तसेच, भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचारकी चेहरा होता. आजही तो आहेच. परंतू, आता स्थिती बरीच बदलली आहे. गेल्या पाच वर्षात भाजप आणि मोदी सरकारचा कारभारही जनतेने पाहिला आहे. तसेच, विविध मुद्द्यांवरुन शिवसेना-भाजप यांच्यातील राजकीय संबंध आणि संघर्षही जनतेने पाहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजून कौल देते याबाबत उत्सुकता आहे.
Shirdi Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान शिवसेना (Shiv Sena) खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande),काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble), बहुजन वंजित आघाडी (VBA) उमेदवार अरुण साबळे (Arun Sabne) यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Lok Sabha Constituency) म्हटलं की आठवते ते विखे पाटील कुटुंब. दिवंगत काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांनी या मतदारसंघातून एक-दोन नव्हे तर तब्बल 9 वेळा या मतदारसंघातून लोकसभेसाठी प्रतिनिधित्व केले आहे. मतदारसंघ फेररचना झाली आणि हा मतदारसंघ अनुसुचीत जातींसाठी राखवी झाला. लोकसभा निवडणूक 2019 मध्येही हा मतदारसंघ राखीवच आहे. त्यामुळे विखे पाटील कुटुंबीयांना अहमदनगर मतदारसंघाचा आश्रय घ्यावा लागला. त्यावरुन झालेले विचित्र राजकारणही त्या निमित्ताने महाराष्ट्राने जवळून पाहिले. तर, अशा या मतदारसंघात 2014 मध्ये शिवसेना उमेदवार निवडणूक आला. आताच्या (2019) निवडणुकीतही शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना तिकीट दिले आहे. तर, त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) रिंगणात आहेत. तर, बहुजन वंजित आघाडी (VBA) अरुण साबळे (Arun Sabne) यांच्या रुपात निवडणूक लढवत आहे.
एकूण 28 उमेदवार रिंगणात
शिर्डी मतदारसंघामध्ये एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे
कांबळे भाऊसाहेब मल्हारी (इंडियन नँशनल काँग्रेस), बन्सी भाऊराव सातपुते (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना), सुरेश एकनाथ जगधने (बहुजन समाज पार्टी), अशोक जगदीश जाधव (राष्ट्रीय मराठा पार्टी), प्रकाश कचरु आहेर (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ), विजय ज्ञानोबा घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना), संजय लक्ष्मण सुखदान (वंचित बहुजन आघाडी), ॲड.अमोलिक गोविंद बाबुराव (अपक्ष ), डॉ. अरुण प्रभाकर साबळे (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), किशोर लिंबाजी रोकडे (अपक्ष), क्रांती अरुण साबळे (अपक्ष), गणपत मच्छिंद्र मोरे ( अपक्ष), गायकवाड अशोक रामचंद्र (अपक्ष), प्रदिप सुनिल सरोदे (अपक्ष ), बागूल भुमिका आशिष (अपक्ष ), बापू पाराजी रणधीर (अपक्ष ), बोरगे शंकर हरिभाऊ (अपक्ष ), भाऊसाहेब जयराम वाकचौरे (अपक्ष), राजेंद्र रत्नाकर वाकचौरे (अपक्ष), वाकचौरे भाऊसाहेब राजाराम (अपक्ष ), वाघमारे प्रकाश गुलाब (अपक्ष ), सचिन सदाशिव गवांदे (अपक्ष ), सदाशिव रामचंद्र वाकचौरे (अपक्ष), सरोदे अंबादास लक्ष्मण (अपक्ष), सुभाष दादा त्रिभुवन (अपक्ष), संपत खंडू समिंदर (अपक्ष) वैध ठरले आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ
- अकोले विधानसभा मतदारसंघ
- संगमनेर विधानसभा मतदारसंघ
- शिर्डी विधानसभा मतदारसंघ
- कोपरगाव विधानसभा मतदारसंघ
- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ
- नेवासा विधानसभा मतदारसंघ
दरम्यान, 2014 च्या निवडणुकीवेळी वातावरण वेगळे होते. काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार विरोधात लाट होती. तसेच, भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचारकी चेहरा होता. आजही तो आहेच. परंतू, आता स्थिती बरीच बदलली आहे. गेल्या पाच वर्षात भाजप आणि मोदी सरकारचा कारभारही जनतेने पाहिला आहे. तसेच, विविध मुद्द्यांवरुन शिवसेना-भाजप यांच्यातील राजकीय संबंध आणि संघर्षही जनतेने पाहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजून कौल देते याबाबत उत्सुकता आहे. शिर्डी मतदारसंघामध्येही ही उत्सुकता कायम आहे. येत्या 29 एप्रिल 2019 ला या मतदासंघात मतदान पार पडत आहे. तर, 23 मे रोजी मतमोजणी आहे. त्या दिवशी निकाल काय लागतो हे पाहायचे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)