Sharad Pawar On Coronavirus Vaccine: पुणे येथील सीरम इंस्टीट्युटमध्ये जाऊन कोरोनाची लस घेतल्याच्या अफवांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Sharad Pawar On Coronavirus Vaccine: महाराष्ट्रात कोरोनाचे झपाट्याने रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहेच. पण आता एक दिलासादायक बाब म्हणजे पुण्यातील (Pune)  सीरम इंन्स्टिट्युट  (Sriram Institute) येथे कोरोनावरील लस विकसित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सीरम इंन्स्टिट्युटला भेट दिली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा शरद पवार यांनी सीरम इंन्स्टिट्युटला भेट दिल्याचे समोर आले होते. त्याचसोबत पवार यांनी कोरोनावरील लस घेतल्याची अफवा ही परसली होती. मात्र आता शरद पवार यांनी या अफवांर अखेर स्पष्टीकरण दिले आहे.(Maharashtra Coronavirus: महाराष्ट्रामधील कोरोना विषाणू लढाईमध्ये राज्यात Dhule जिल्ह्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्क्यांवर)

शरद पवार यांनी असे म्हटले आहे की, सीरम इंन्स्टिट्युट येथे जाऊन कोरोनावरील लस घेतलेली नाही. परंतु रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीसीजीचे इंजेक्शन घेतले होते. माझ्यासोबत कर्मचाऱ्यांनी सुद्धा ते घेतले होते. पण ही कोरोनावरील लस नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. सीरम इंन्स्टिट्युला भेट देत शरद पवार यांनी कोरोनावरील लसीच्या कामासंदर्भात आढावा घेतल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याचसोबत जानेवारी महिन्याच्या अखेर पर्यंत सीरम इंन्स्टिट्युट कडून तयार करण्यात येणारी लस उपलब्ध होईल असे म्हटले आहे.(महाराष्ट्र: राज्यात Remdesivir चा काळाबाजार होण्यासह रुग्णांवर मृत्यू ओढावत असल्याने औषध मोफत उपलब्ध करुन द्यावे; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी)

दरम्यान, सीरम इंन्सटीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी नुकतेच असे म्हटले होते की, 2024 वर्षापूर्वी जगातील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळू शकणार नाही आहे. ऑनलाईन मीडिया रिपोर्टनुसार, अदार पूनावाला यांनी पुढे सांगितले की औषध कंपन्यांच्या उत्पादनात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे कमी काळातच संपूर्ण जगाला कोरोनावरील लसीचे डोस दिले जातील असा विश्वास ही पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.