कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवार यांची भेट
Sharad Pawar, Balasaheb Thorat (Photo Credit - FB/PTI )

विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महाआघाडीला सत्ता स्थापनेचे वेध लागले आहेत. शिवसेनेला सोबत घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगंली आहे. या पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची गोविंबाग या निवासस्थानी भेट घेतली. (हेही वाचा - राष्ट्रवादी पक्षाला सत्ता स्थापनामध्ये रस नाही आम्ही 'विरोधी पक्षा'ची भूमिका निभावू: प्रफुल पटेल)

सत्ता समीकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पवार आणि बाळासाहेब यांच्या भेटीत नेमकी काय खलबतं झालं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 54 तर काँग्रेसने 50 जागेवर विजय मिळवला आहे. तर या निवडणुकीमध्ये 13 अपक्ष आणि अन्य पक्षातील उमेदवार अमदार म्हणून निवडून आले आहेत.

हेही वाचा - शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यशात महत्त्वाचा सहभाग असलेले दोन 'अमोल'

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असले तरी भाजप-शिवसेना यांच्यातील गणित बिघडले तर सत्ता कोण स्थापन करेल? हा प्रश्न सध्या राज्यभरात जोर धरत आहे. भाजपने आतापर्यंत शिवसेनेला सत्तेत सहभागी होण्यापासून डावलले आहे. पंरतु, यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, अशी घोषणा प्रचारावेळी केली होती. ठाकरे यांनी केलेले हे स्वप्न भाजपसोबत राहुन पूर्ण होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.