Indian Army | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: ANI)

भारतातील पहिली सैनिकी शाळा 'सातारा सैनिकी स्कूल' (Satara Sainiki School) मध्ये आता मुलींना देखील प्रवेश खुले झाले आहेत. मागील 61 वर्षांत पहिल्यांदा मुलांच्या बरोबरीने मुलींनाही सैनिकी शिक्षण या शाळेत दिले जाणार आहे. सातारा सैनिकी स्कूल मध्ये 6वी ते 12वीचे शिक्षण निवासी शाळेमध्ये दिले जाते. यंदा प्रथमच 10 मुलींना प्रवेश देण्यात आला आहे.

सैनिक स्कूलमधील दहा जागांसाठी 611 विद्यार्थिनींनी प्रवेश परीक्षा दिली होती. दरम्यान निवड झालेल्या दहा जणींमध्ये 2 पश्चिम बंगालच्या, 7 महाराष्ट्र मधील आणि एक बिहारची विद्यार्थिनी आहे. 12 वीनंतर या दहा मुली एनडीएसाठी पात्र ठरणार आहेत.

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने 23 जून 1961 रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा साताऱ्यात सुरू झाली. नक्की वाचा: NDA Exam 2021 मध्ये महिला उमेदवारांना सहभागी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या Interim Order जारी.

यंदा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात  एनडीएमध्ये ( NDA) प्रवेशासाठी देखील पहिल्यांदाच मुलींसाठी देखील परीक्षा सुरू करण्यात आली आहे. 14 नोव्हेंबरला झालेल्या सी डी एस ई लेखी परीक्षेत  1002 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या सर्व मुलींच्या आता बौद्धिक, शारीरीक आणि मानसिक क्षमतेच्या चाचण्या होणार आहेत आणि या चाचण्यांमधून केवळ 19 जणींना एनडीएमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.  एनडीएमध्ये (NDA) महिलांची पहिली बॅच 2023 पासून सुरु होणार आहे.