Sex करण्यास विद्यार्थिनीने नकार दिल्याने हत्या, आरोपीला अटक
फोटो सौजन्य - फाइल फोटो

Sangali : शांतिनिकेतन येथील लोकविद्यापीठातील मुक्त विद्यापीठामध्ये एका विद्यार्थिनीची निघृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  या प्रकरणी आरोपी प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

ऋषिकेश कुडाळकर असे या आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. तर वैशाली नलावडे असे मृत तरुणीचे नाव आहे. तसेच वैशालीला लहान मुलगा आहे. वैशालीने मुक्त विद्यापीठात SYBA साठी प्रवेश घेतला होता. तसेच मुक्त विद्यापीठ फक्त रविवारी सुरु ठेवण्यात येते. या विद्यापिठात शिकण्यास येणाऱ्या वैशालीला लैंगिक संबध ठेवण्यास प्राध्यापक ऋषिकेशने विचारले होते. तसेच ऋषिकेशला वैशालीचे माहेरच्या येथील एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचे कळले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या ऋषिकेशने वैशालीचा काटा काढण्याचे ठरविले. मात्र रविवारी विद्यापीठात आलेल्या वैशालीला लॉजवर घेऊन जाऊन तिची हत्या करण्याचा कट ऋषिकेशने रचला होता. मात्र वैशालीने त्याच्याशी लैंगिक संबंधासाठी नकार दिला. त्यामुळे पुन्हा रागाच्या भरात विद्यापीठाच्या वर्गात ऋषिकेशने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

या प्रकरणी पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने विद्यापीठातील सीसीटिव्हीची छायाचित्रे पाहिली. त्यावेळी आरोपी ऋषिकेश त्यामध्ये आढळून आला. पोलिसांनी सापळा रचून आरोपी प्राध्यापक ऋषिकेशला अटक करण्यात आली आहे. त्याला आज मंगळवारी न्यायालयात हजर करणार आहे.