Karuna Munde: करुणा मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; प्रकरणाला नवे वळण मिळाल्याची चर्चा

त्याच्या विरोधात अहमदनगर (Ahmednagar) पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर येथील एका कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Karuna Munde | (File Image)

करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. त्याच्या विरोधात अहमदनगर (Ahmednagar) पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर येथील एका कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात स्वतंत्र राजकीय पक्ष काढला आहे. त्या राजकीय क्षेत्रात हात पाय मारत असतानाच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्यांचा मार्ग अधिकच खडतर झाला आहे.

करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच फिर्याद दिली होती की, संगमनेर येथील एका कार्यकर्त्याने त्यांची 30 लाख रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, आता याच कार्यकर्त्याने उलट तक्रार देत करुणा मुंडे यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या कार्यकर्त्याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, करुणा मुंडे यांनी क्षनिधीच्या नावाखाली माझी ३४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. (हेही वाचा, Karuna Munde यांना 30 लाखांचा गंडा; बांधकाम कंपनीत नफ्याचे आमिष दाखवून तिघांनी केली फसवणूक, गुन्हा दाखल)

करुणा मुंडे यांनी शिवशक्ती नावाचा पक्ष स्थापन केल्याची घोषणा काही काळापूर्वीच केली होती. त्यांनी मधल्या काळात कोल्हापूर येथन निवडणूक लढविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याचा त्यांना काहीच फायदा झाला नाही. दुसऱ्या बाजूला राजकीय क्षेत्रात हातपाय मारणाऱ्या करुणा मुंडे यांना सुरुवातीपासून विविध अडचणींचा सामना करावा लागला आहे. या अडचणींचा सामना करताना त्यांना तुरुंगाचीही हवा खावी लागली आहे. आता त्यांच्यावर थेट फसवणूकीचाच गुन्हा दाखल झाला आहे.

करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेरमधील भारत भोसले यांच्यासह तिघांविरुद्ध फिर्याद दिली होती. या फीर्यादीत त्यांनी म्हटले होते की, भारत भोसले यांच्यासह तिघांनी पक्षाला निधी मिळविण्यासाठी आणि नफा मिळवून देण्यासाठी त्यांच्या बांधकाम कंपनीत तब्बल 30 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते. दरम्यान, करुणा शर्मा यांच्या फिर्यादीनंतर आता उलट फिर्याद आल्याने प्रकरणातील दुसरी बाजूही पुढे आली आहे.