Sameer Desai  Joins Shiv Sena: भाजपला मोठा धक्का, समीर देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश
समीर देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश (Photo Credits-Facebook)

काँग्रेसचे माजी दिग्गज नेते गुरुदास कामत यांचा भाचा आणि भाजप नेते समीर देसाई (Sameer Desai) यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी शिवसेनेत  (Shiv Sena) प्रवेश केला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत समीर देसाई यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. तर देसाई यांच्यासह समर्थकांना योग्य तो सन्मान दिला जाईल असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. परंतु समीर देसाई यांच्या शिवसेना पक्षातील प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.(Ajit Pawar Slams Maharashtra Governor: शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांनीही राज्यपालांवर साधला निशाणा)

मातोश्री येथे समीर देसाई आणि समर्थकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन बांधले आहे. तर समीर देसाई यांनी आपला राजकरणातील प्रवास काँग्रेस पक्षापासून सुरु केला होता. त्यावेळी पक्षाच्या प्रवक्त्याचा कार्यभार सुद्धा त्यांनी सांभाळला होता. तर 2018 मध्ये माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनानंतर समीर देसाई यांनी भाजपात एन्ट्री केली होती.(Dr. Dhavalsinh Mohite Patil: भाजपला धक्का, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील करणार काँग्रेस पक्षात प्रवेश)

मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई जी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Posted by ShivSena on Tuesday, 26 January 2021

देसाई यांनी असे म्हटले की, दुफळी वाढल्यानंतर त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. पण भाजपात आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपात अस्वस्थता वाटत असल्याने शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.