Maharashtra: शिर्डीतील साई बाबांच्या मंदिराची रेकी, दुबईहून आलेल्या दहशतवाद्यांनी दिली कबुली
शिर्डी साईबाबा मंदिर ( Photo Credit: Wikimedia Commons )

Maharashtra: महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थ स्थान शिर्डी हे दहशतवाद्यांच्या रडावर आहे. तर दुबईतून अटक करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याची चौकशी करण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्याने असे म्हटले की, शिर्डी येथे येत रेकी केली. गुजरातच्या एटीएसकडून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेसंबंधित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत हा खुलासा झाला आहे.  ज्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या या दहशतवाद्याचे नेटवर्क पाकिस्तानात आहे.

दहशतवाद्याची चौकशी केली असता शिर्डीतील मूळ स्थानिक आणि दिल्लीतील एका हिंदू न्यूज चॅनलच्या संपादकाच्या घरासह ऑफिसची रेकी केल्याचे म्हटले आहे. गुजरातच्या एटीएसने दहशतवाद्यांकडून अवैध शस्रे आणि विस्फोटक जप्त केली आहेत. यापूर्वी सुद्धा काही वेळा शिर्डी संस्थेला धमकीचे फोन आणि मेल आले होते. या नव्या कटाच्या खुलास्यानंतर मंदिर प्रशासनाने सुरक्षितेत अधिक वाढ केली आहे.(Maharashtra: शिवजयंती साजरी करण्यासाठी कोणत्याही अटी पाळणार नाही, भाजप नेते राम कदम यांचा ठाकरे सरकावर हल्लाबोल)

गुजरातच्या एटीएसने ज्या दहशतवाद्यांची चौकशी केली त्यात आणखी काही खुलासे झाले आहेत. त्यांनी असे म्हटले की, सुदर्शन टीव्हीचे संपादकांचे शिर्डीतील घराची सुद्धा रेकी केली आहे.दुबईतून अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव मौलाना शब्बीर पठान, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी असे आहे. या लोकांनी सुरेश चव्हाण यांचे मुळ स्थान शिर्डीतील घराची रेकी केल्याची कबुली दिली आहे. या दहशवाद्यांकडे अवैध शस्रे, विस्फोटक आणि दारुगोळा मिळाला आहे.