'दाऊदला इब्राहिमला भारतात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा'; रोहित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ट्विटच्या माध्यमातून केली मागणी
Rohit Pawar, PM Modi And Dawood (Photo Credits: Twitter)

मुंबईला साखळी बॉम्बस्फोटाने हादरवून टाकणा-या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम पाकिस्तानाच असल्याची खबर लागताच त्या दिशेने सर्व सूत्रे जोरदार कामाला लागली आहेत. पाकिस्तान सरकारकडूनच ही बातमी सांगण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून अनेक टीका होण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विशेष मागणी केली आहे. ज्यात 'दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा,' असे सांगण्यात आले आहे.

रोहित पवारांनी पंतप्रधानांना या ट्विटमध्ये टॅग करत त्यांच्याकडे ही मागणी केली आहे. 'दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचं पाकिस्तानं कबूल केलं आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी मी पतंप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो. दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा', असं रोहित पवार म्हणाले आहेत. दाऊद इब्राहिम, हाफिज सईद, मसूद अजहर यांच्यावर प्रतिबंद; FATF 'ग्रे लिस्ट' मधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानची धडपड

पाहा ट्विट:

दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यामागे तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये प्रतिबंद लावण्यात आलेल्या यादीत दाऊद इब्राहिम, हाफीज सईद, अजहर, मुल्ला फजलुल्ला (उर्फ मुल्ला रेडियो), जकीउर रहमान लखवी, मुहम्मद यह्या मुजाहिद, अब्दुल हकीम मुराद, नूर वली महसूद, उजबेकिस्तान लिबरेशन मूव्हमेंट चा फजल रहीम शाह, तालिबान नेता जलालुद्दीन हक्कानी, खलील अहमद हक्कानी, यह्या हक्कानी, दाऊद इब्राहीम आणि त्याच्या हस्तकांचा समावेश आहे.